रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रातून चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. जून महिन्यात ती सुरु होणार. तसेच 28 राज्यातून वंदे भारत एक्स्प्रेस जून महिन्यापासून धावणार आहे.कोकणात खेडला ही गाडी सर्वात आधी पोहचणार आहे. खेड रेल्वे स्थानकात ही गाडी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात ही गाडी 10 वाजता पोहचणार आहे. दुपारी 1 वाजेच्या सुमारास गाडी मडगावला पोहोचू शकते.
वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे अनेक मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली आहे. यामुळे अनेक ठिकाणी ती सुरु करण्याची मागणी केली जात आहे. आता महाराष्ट्रातून लवकरच चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मुंबई-गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी गाडी मुंबई-गोवा सुरु होणार आहे. येत्या ३ जूनपासून ही गाडी धावणार असल्याने कोकणवासीयांना कमी वेळेत गावी जात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी दाखवणार हिरवा कंदिल गेल्या काही दिवसांपासून कोकणवासीय आणि चाकरमान्यांना लागून राहिलेली उत्सुकता अखेर संपलीय आहे. कारण वंदे भारत एक्स्प्रेस ३ जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. 5 जूनपासून सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा कंदिल दाखवला जाणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ठाण्याला सकाळी 6 वाजून 5 मिनिटाला पोहचणार आहे. पनवेल ही गाडी 6 वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आहे.परतीचा प्रवासात मडगाव येथून वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल. रत्नागिरी रेल्वे स्थानकात ही गाडी 5 वाजून 35 मिनिटांनी पोहचणार आहे. खेड रेल्वे स्थानकात 6 वाजून 48 मिनिटांनी पोहचणार आहे तर मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ला ही गाडी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.वंदे भारत एक्सप्रेसची अजून बुकींग सुरु झाले नाही. परंतु एक-दोन दिवसांत आयआरसीटीसीच्या साईटवरुन बुकींग करता येणार आहे.
मुंबई ते गांधीनगर ट्रेन
मुंबई सेंट्रेलवरुन सकाळी 6:00 वाजता सुटेल आणि गांधीनगरला 12:25 वाजता पोहचणार आहे.
गांधीनगरवरुन दुपारी 2:05 वाजता सुटेल तर मुंबईत रात्री 8:25 ला पोहचणार आहे.
मुंबई ते गांधीनगर अंतर : 522 km.
