उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना 100 कोटींची ऑफर – नितेश राणे

येत्या 19 जूनला उद्धव ठाकरे आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन करण्याची घोषणा करणार आहे. महाविकास आघाडी स्थापन होत असताना संजय राऊतांनी दलाली करण्यासाठी तेव्हा 200 कोटी घेतले होते अशी माझी माहिती आहे. तसेच उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना 100 कोटींची ऑफर आहे, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच, 19 जूनला उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. 19 जूनला होणारा उद्धव ठाकरेंचा षण्मुखानंदमधला मेळावा अनाअधिकृत आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितेश राणे म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वात 9 वर्षात देशाने प्रगती केली आहे. कोणीही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. हे राऊत यांच्या सारख्या दलालांना कळणार नाही. तुमच्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी 7.30 नंतर डिनो मोरियाच्या घरी कोणा कोणाला नाचवायचा? असे नितेश राणे म्हणाले. यासोबतच शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. येत्या 19 जूनला उद्धव ठाकरे आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन करण्याची घोषणा करणार आहे.19 जूनला उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. असे नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा टिनपाट कामगार आज सकाळी येऊन मोदी सरकारमुळे नाकी नऊ आलेले आहे, अराजकता आली आहे असं बरळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे दहशतवादांच्या नाकीनऊ आले आहेत. भ्रष्टाचारी लोकांच्या नाकीनऊ आले आहे. मोदींच्या नेतृत्वात 9 वर्षात देशाने प्रगती केली आहे. कोणीही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. हे राऊत यांच्या सारख्या दलालांना कळणार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली. म्हणे मोदी साहेब लोकांची मन की बात ऐकत नाही, पत्रकार परिषदा घेत नाही. मग तुझ्या मालकाने अडीच वर्षात फक्त फेसबुक लाईव्ह केलं. अडीच वर्षात किती लोकांची मन की बात ऐकली? की फक्त पाटणकरचीच बात ऐकली, असा सवाल नितेश यांनी केला.