राज्यात दिलासादायक परिस्थिती, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट…!


राज्यात कोरोना संबंधी आता दिलासादायक परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. हळू हळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता घटनाता दिसून येत आहे. ८ राज्यात सध्या ५० हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. ज्यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकांवर आहे. मात्र आता राज्यात पॉजिटिव्हिटी रेट देखील कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे नागिरकांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

केरळमधील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 47% आहे. तर मिझोरममध्ये 34% आहे. दहा टक्केंपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणारे देशात  297 जिल्हे आहेत.

लसीकरण करुन घेण्याचं आवाहनही आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले. देशात सध्या 96% टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर  76% लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.  तसेच 15 ते 18 वयोगटातील 65% मुलांनी पहिला डोस घेतला आहे.   प्रिकॉशनरी डोसचीही संख्या मोठी आहे. आतापर्यंत 1.35 कोटी  प्रिकॉशनरी डोस देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांत देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या आठवड्यातील दैनंदिन रुग्णसंख्या 2.04 लाख आहे. देशात एकूण सक्रिय रुग्ण 15,33,000 आहेत. गेल्या आठवड्यात पॉझिटीव्हीटी दर 12.98% नोंदवण्यात आला. सक्रीय रुग्णसंख्येत महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. राज्यात एकूण सक्रीय रुग्णसंख्या (7 दिवसांपूर्वी) – 3,02,572 इतकी आहे. राज्यातील आजची सक्रीय रुग्णसंख्या 1,77, 131 इतकी आहे.  आतापर्यंत एकूण लसीकरण- 167.88 कोटी झाले आहे. 18 वर्षावरील लोकसंख्येत 96% नागरिकांनी घेतली पहिली मात्रा घेतली आहे. तर, 76% नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे.  तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचे सरासरी वय 44 वर्षे आहे, जे यापूर्वी 55 होते. घसादुखीचे प्रमाण 29% एवढे आहे, जे पूर्वी 16% होते. तिसऱ्या लाटेत तुलनेने गोळ्या सेवनाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणानंतर मृत्यूचे प्रमाण 10% (91% सहव्याधी) लस न घेतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 22% (83% सहव्याधी) इतके आहे. 


एकूणच आता परिस्थिती आटोक्यात येत आहे, असे दिसून येत आहे. आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.