
“सराकारने जो किराणा दुकानांमध्ये दारूविक्री करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याविषयी आता सरकारमध्येच असलेले शरद पवार यांनी सुद्धा सरकारने हा निर्णय मागे घ्यावा असा सरकारला सल्ला दिला आहे. एकप्रकारे पवार यांनी सरकारला म्हटले आहे कि “सुधरा”.” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, हा भाजपचा संकल्प :
यावेळी प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले कि, “समाजाच्या सर्व स्तरातून या निर्णयाचा विरोध होत आहे. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, असा भाजपचा संकल्प आहे.” असेही ते यावेळी म्हणाले. सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा आहे. महाराष्ट्राची अनेक कुटुंबं यामुळे बरबाद होतील. असे मत समाजाच्या अनेक स्तरांमधून येत आहे.
महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानांमधून, सूपर मार्केट मधून वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच समजय राऊत यांनी ‘वाईन म्हणजे दारू नाही’ असे वक्तव्य देखील केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे.
सरकार आता हा निर्णय परत घेतं का ? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
