
महाराष्ट्रात कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे यासंबंधात काय करायचे या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा झाली असता, राज्यात अद्याप लॉकडाउन लावण्यात येणार नाही, मात्र नियम पाळले गेले नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल असे सरकारने ठरवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या जनतेला लॉकडाउन हवे आहे कि थोड्या फार निर्बंधांसह मोकळे जगायचे आहे, हे जनतेने ठरवायचे आहे, असे मत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या काळात जर कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर लॉकडाउन करण्यात येईल का ? असा प्रश्न इथे उपस्थित होतो.
लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असं राज्यातील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सद्य परिस्थितीत लॉकडाउन हा उपाय नसता, योग्य ती काळजी घओऊन कठोरतेने नियम राबविले गेले पाहिजेत. त्यानुसार चाचण्या झाल्या पाहीजेत आणि पॉजिटिव्ह आलेल्यांचे संपर्क देखील शोधले गेले पाहिजेत | कोव्हिड संपलेला नाही, मात्र आता तो वाढू देखील द्यायचा नाहीये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एकूणच महाराष्ट्र सरकार कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यास सक्षम ठरलेले नाही, देशातील सर्वाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले होते तसेच येथील गलथान कारभाराबद्दल देखील अनेक घटना समोर आल्या होत्या, त्यामुळे आता जर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर मात्र सरकारला सज्ज होवून सिस्टिमेटिक पद्धतीने ही परिस्थिती हाताळणे आवश्यक झाले आहे.
