
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात, पुण्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्युने / आत्महत्येने खळबळ माजली आहे. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री असलेले संजय राठौर यांच्यावर खूप मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पूजा चव्हाण ने खरंच आत्महत्या केली का ती हत्या होती ? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. त्यामुळे नेमके हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे ? आणि यावरुन राजकीय वादळ का उठले आहे, जाणून घेूयात.
पुण्यातील एक टिकटॉक स्टार ‘पूजा चव्हाण’ हिच्या आत्महत्येची बातमी समोर येताच, महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. मूळची बीड येथील परळीतील निवासी पूजा, जी आता पुण्याला राहत होती, हिने रविवारी रात्री पुण्यातील एका उंच ईमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले. मात्र खरी खळबळ तेव्हा माजली जेव्हा या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठौर यांचे नाव समोर आले. पूजा यांचे संजय राठौर यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जात आहे, आणि त्या संबंधांमधूनच पूजाने आत्महत्या केली असल्याचे देखील म्हटले जात आहे. मात्र विरोधी पक्षाने पूजाच्या मृत्युची योग्य ती तपासणी झालीच पाहिजे असे म्हटले आहे, तसेच ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचा संशय विरोधी पक्षाने व्यक्त केला आहे.
राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याचे या आधी देखील सिद्ध झाले आहे, सुशांत सिंह मृत्यु प्रकरण असू देत नाहीतर पालघर येथील साधूंची झालेली मॉब लिंचींग. या सगळ्यां प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येते. त्याच प्रमाणे या प्रकरणात देखील राज्य सरकारने पोलिसांवर तर जबाव घातला नाही ना ? असा प्रश्न आता सामान्य जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे.
या संदर्भात एक ऑडियोक्लिप देखील समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण लागले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिदेशक हेमंत नागराळे यांना ११ ऑडियो क्लिप्स आणि पत्र पाठवत निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी केली आहे.
एकूण पूजा ने आत्महत्या का केली ? त्या ऑडियोक्लिप्स मध्ये असे काय आहे, ज्यामुळे संजय राठौर यांच्यावर निशाणा साधला जात आहे, आणि याप्रकरणात पुढे काय होईल याविषयी सामान्य जनतेला उत्सुकता आहे, तसेच पूजाला न्याय हा मिळायलाच हवा, असे देखील सामान्य जनतेचे मत आहे.
