राज्यात कोरोनाचे थैमान पुन्हा एकदा वाढले…!


राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान वाढले आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाउन सदृश्य परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. एक वर्षाआधी २५ मार्च रोजी संपूर्ण देशात लॉकडाउन लावण्यात आले होते, आणि भारत देश अक्षरश: थांबला होता, तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून अनेक नियम देखील लागू करण्यात आले आहेत. मात्र राज्यात कोरोनाचे रुग्ण अचानक इतके कसे वाढले ? या प्रश्नाचे उत्तर मात्र सध्या कुणाच कडे नाही. त्यातून राज्य सरकार सध्या सचिन वाझे प्रकरणात गुंतल्यामुळे कोरोनाच्या राक्षसाकडे त्यांचे लक्ष आहे का असा प्रश्न देखील इथे निर्माण झाला आहे.

राज्यात १५ मार्च रोजी १५ हजार हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले, त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा राक्षस वर डोके काढतो आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला. यासाठी सध्या महाराष्ट्रातील विविध रेस्टॉरेंट्स आणि सिनेमागृहांमध्ये अनेक नियम लावण्यात आले आहेत. लग्न समारंभांमध्ये ५० लोकांहून अधिक नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी नाही, तसेच अंत्यसंस्कारात २० हून अधिक लोग सहभागी होऊ शकत नाही, असे शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना परिस्थिती पाहता :

१. नागपुर येथे २१ मार्च पर्यंत लॉकडाउन लावण्यात आले आहे.
२. पुणे येथे ३१ मार्च पर्यंत रात्री ११ ते सकाळी नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे.
३. पुण्यातील सर्व शाळा कॉलेज ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
४. ठाणे येथील १६ हॉटस्पॉट ठिकाणांवर ३१ मार्च पर्यंत लॉकडाउन लावण्यात आले आहे.
५. औरंगाबाद येथे ४ एप्रिल पर्यंत रात्री ९ ते सकाळी ६ असा नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

एकूण काय तर संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाच्या सावटाखाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळीजी घ्यावी आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे.