सचिन वाझे, परमबीर सिंह ही तर प्यादी, खरे सूत्रधार कोण ?

महाराष्ट्रात सध्या सचिन वाझे प्रकरण प्रचंड तापले आहे. राज्य सरकार या प्रकरणामुळे कोंडीत सापडते आहे, आणि त्यामुळेच राज्य सरकार वर निशाणा साधत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार वर कडाडून टीका केली आहे. एंटालिया समोर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु आणि सचिन वाझे यांना मिळणारा राजाश्रय यामुळे एक मोठं षडयंत्र शिजतंय आणि त्याचा पर्दाफाश व्हायलाच हवा, अशी भूमिका पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

सचिन वाझे, आणि परमबीर सिंह ही प्यादी आहेत, सरकार मधील त्यांचा सूत्रधार कोण ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. सरकारवर गंभीर आरोप करत फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट या पत्रकार परिषदेत केले. फडणवीस गृहमंत्री पदावर असताना त्यांच्यावर सचिन वाझे यांना पोलिस सेवेत परत घेण्याचा दबाव टाकण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता, असे देखील त्यांनी या पत्रकार परिषदेच्या दरम्यान स्पष्ट केले.


सचिन वाझे हे थेट पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनाच रिपोर्ट करत होते, त्यामुळे नेमकं पाणी मुरत कुठे होतं. मनसुख हिरेन यांचा मृत्यु कसा झाला, त्यांचा मृत्यु बुडून झाला, तर त्यांच्या फुफ्फुसात पाणी शिरले पाहिजे, मात्र तसे झेल नाही, तर या सगळ्यात हिरेन यांची काय भूमिका होती, आणि हिरेन, वाझे, परमबीर सिंह या सर्व प्याद्यांना नाचवणारा सूत्रधार कोण आहे ? असे अनेक गंभीर प्रश्न फडणवीसांच्या या पत्रकार परिषदेने उपस्थित केले.


परमबीर आणि वाझे या लोकांना सरकारमधील काही नेत्यांचा आशीर्वाद आहे, तेव्हात ते हे सर्व करू शकले, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले. आता कितीही दबाव आला, सरकारमध्यल्या कुठल्याही नेत्यापर्यंत हे धागे दोरे जावून पोहोचले तरी देखील तपास यंत्रणांना या प्रकरणाचा छडा लावावाच लागेल. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

एकूणच हे प्रकरण अतिशय भयंकर आहे, आणि यामागे नक्कीच सरकारमधल्या मोठ्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे, ज्याला वाचविण्यासाठी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येत आहे. असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे, पुढे काय होते आणि या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे, हे तर काळच सांगेल.