
बंगाल येथे विधानसभा निवडणूकींचे निकाल आल्यापासूनच ‘बंगाल’ हे राज्य एकूणच चर्चेचा विषय झाले आहे. बंगाल मध्ये विजय तृणमूल काँग्रेस पक्षाचा जरी झाला असला, तरी देखील ममता बॅनर्जी यांचा पराजय झाला. भारतीय जनता पक्षाने ३ जागांवरून ८३ जागांवर मुसंडी मारली आहे, आणि हे कदाचित सत्तारूढ पक्षाच्या पचनी पडत नाही, असे दिसून येत आहे. त्यामुळेच गेल्या तीन चार दिवसांपासून बंगाल येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडत आहे. यामध्ये टीएमसीची गुंडं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापासून ते जीवे मारण्यापर्यंत हिंसेच्या सीमेची पराकाष्ठा गाठताएत. भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचा बलात्कार करण्यात आला, त्यांची निघृण हत्या करण्यात आली, मात्र कुणीही काही करू शकले नाही, हे अत्यंत वाईट आणि विदारक आहे.
आज बंगाल येथे केंद्रीय मंत्री वी मुरलीधरन यांच्या ताफ्यावर टीएमसीच्या गुंडांनी हल्ला चढवला. त्यांच्या कारच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यांच्या स्वीयसहाय्यकांना मारहाण करण्यात आली. आणि तरी देखील बंगाल येथे हिंसाचार थांबलेला नाही. याविषयी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि, “भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतात झालेल्या सगळ्यात मोठ्या हिंसाचाराचा आम्ही तीव्र निषेध करतो, आधी हजारो भाजपचे कार्यकर्ता आणि आता केंद्रीय मंत्री. बंगाल पेटले आहे.”
बंगाल येथे गेल्या ४ दिवसात भाजप समर्थक आणि कार्यकर्ता यांच्या घरांना आग लावण्यात आली, कार्यकर्त्यांना पकडून पकडून जीवे मारण्यात आले. महिला कार्यकर्त्यांचे अपहरण, गँगरेप आणि नंतर हत्या अशा घटना देखील घडल्या. अनेक लोक बंगालला मिनि काश्मीर म्हणताएत, जिथे आज हिंदू आणि भाजप समर्थक बंगाल सोडायला, पलायन करायला आज हतबल झालेला आहे. तसे न केल्यास आपल्या नाहीतर आपल्या परिवाराच्या जीवाला मुका. हा कुठल्या न्याय ?
आज सामान्य जनता केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे बंगालच्या जनतेच्या सुरक्षेची मागणी करतेय, तसेच ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्याची मागणी करतेय. तसे लवकरच न केल्यास बंगालचे काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही. बंगाल जळतंय, आणि बंगालला आपली आवश्यकता आहे, हा हिंसाचार लवकरात लवकर थांबलाच पाहिजे.
