“महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह आहे, आणि औरंगजेबाच्या मजारीवर जाणे शिष्टाचार”



महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह आहे, आणि औरंगजेबाच्या मजारीवर जाणे शिष्टाचार आहे.” असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. माध्यमांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी ओबीसी आरक्षणाबद्दल ते म्हणाले कि, “महाराष्ट्राला, मध्यप्रदेशाआधीच न्याय मिळाला असता. मात्र सराकारने आवश्यक पावले उचलली नाहीत. आम्ही दोन वर्षे झाली ओबीसी आरक्षणाच्या ट्रिपल टेस्ट संदर्भात बोलत होतो. मात्र या बाबतीत महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही. तेच काम मध्यप्रदेशाने ६ महीन्यात केले, आणि त्यांना न्याय मिळाला. महाराष्ट्र तसाच राहिला.”असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत केवळ टाईम पास केला :

यावेळी महाराष्ट्र सरकारला चिमटा काढत ते म्हणाले कि, “महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत केवळ टाईमपास केला आहे. त्यांनी केवळ कमिशन तयार केले मात्र त्या कमिशनला पैसे दिले नाहीत. हे या कमीशनने स्वत: सांगितले आहे. जो रिपोर्ट ६ महिन्यात मध्यप्रदेशाने तयार केला, तो गेली २ वर्षे महाराष्ट्र सरकार करू शकले नाही. काल देखील कोर्टाने हे सांगितले आहे कि महाराष्ट्रासहित ज्या ज्या राज्यांमध्ये आरक्षण विषयक समस्या आहे, त्यांनी रिपोर्ट तयार करावा, आणि ओबीसी आरक्षण द्यावे.” मात्र आता महाराष्ट्र सरकार हा रिपोर्ट का तयार करत नाही? असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे.



यावेळी ज्ञानवापी मशिदीबद्दल प्रश्न विचारला असता, ते म्हणाले कि :

यावेळी ज्ञानवापी बद्दल एका पत्रकाराने प्रश्न विचारला कि, “याचे राजकीय परिणाम काय असतील” त्यावर उत्तर देत फडणवीस म्हणाले कि, “याचा राजकीय परिणाम काय होईल याचा मी विचारच करत नाही, कारण हा प्रश्न राजकीय नसून आस्थेचा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे कि कशा पद्धतीने औरंगजेबाने आपल्या मदिंरांना उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे हा आस्थेचा प्रश्न आहे, आणि मला आनंद आहे कि आपल्या देशात न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला हे प्रश्न सोडवणे शक्य आहे.