केवळ आपले राज्य आहे आणि आपले गृहमंत्री आहेत, केवळ या तोऱ्यामुळे भाजपच्या नेत्यांवर हल्ला : फडणवीस



केवळ आपले राज्य आहे, आणि आपला गृहमंत्री आहे, या तोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने परवा अमित शहा यांचा कार्यक्रम खराब करण्याचा प्रयत्न केला, आणि स्मृति इराणी यांच्यावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यांच्यावर अंडी टमाटर फेकण्यात आली. काहीही कारण नसताना हा गदारोळ घालण्यात आला. हा सत्तेचा माज आहे. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नागपुर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.


दोन दिवसांपूर्वी पुणे येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या पुस्तक प्रकाशनाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये राष्ट्रवादी कांग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यानी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांच्या वाहनावर देखील हल्ला करण्यात आला आणि, यावर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, तर आम्हाला जेखील त्याला जशास तसे उत्तर द्यावे लागेल. असे फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

राज्यात लोक कायदा हातात घेत आहेत, बेकायदेशीर कृत्य करत आहेत. सत्ताधारी पक्षातील लोकच असे वागू लागले, तर राज्याच कायदा आणि सुव्यवस्था नाही हे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे स्मृति इराणी यांच्यावर केलेला हा हल्ला अतिशय भ्याड आहे. असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.