वर्धा येथील पूरामुळे दुबार पेरणी संकटात, शेतकऱ्यांना योग्य ती मदत सरकार करेल : फडणवीस


महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस आणि पूर या संकटाने सामान्य माणसाला वेढलं आहे. विदर्भात आलेल्या पूर परिस्थिती मुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खासकरून शेतकऱ्यांना या पाऊस आणि पूरामुळे मोठा फटका बसला आहे. असे असताना राज्य सरकार शेतकऱ्यांना हवी ती मदत करेल आणि दुबार पेरणी खराब झाल्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांना मदतीला असेल, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

अतिशय कठीण अशा परिस्थितीत लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले आहे, आणि ते अजूनही करत आहेत. या संपूर्ण संकटात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रभावी झाला आहे. मोठ्या प्रमाणात दुबार पेरणी करण्यात आली होती, आणि ती आता नष्ट झाली आहे. आताच्या परिस्थितीत पुन्हा एकदा पेरणी करणे शक्य देखील नाही, असे असताना राज्य सरकार शक्य ती सर्वी मदत शेतकऱ्यांना करेल असे ते यावेळी म्हणाले आहेत.



रेक्युचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनांच्या मदतीने लोकांना वाचविण्याचे काम सुरु आहे. जो पर्यंत शेवटच्या व्यक्तीची सुटका होत नाही, शेवटच्या व्यक्तीला वाचविण्यात येत नाही, तोवर हे रेस्क्यु ऑपरेशन सुरुच राहील, असे देखील त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विदर्भात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनता प्रभावित झाली आहे, हिंगणघाट, सेलु सह अनेक तालुक्यांमधील गावांचा मुख्य शहरांशी संपर्क तुटला आहे, त्यामुळे कठीण परिस्थितीत नागरिकांना वाचविण्याचे काम सुरु आहे. हा पाऊस कधी थांबतो, आणि हे संपूर्ण रेस्क्यु ऑपरेशन कधी संपतं, याकडेच आता जनतेचं लक्ष लागलं आहे.