पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला आले शिंदे सरकार धावून…! हेक्टरी 13600 रुपये देण्याचा घेतला निर्णय…!

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे सध्या पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सगळ्यात जास्त नुकसान कुणाचे झाले असेल, तर ते शतकऱ्यांचे आहे. असे असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीला शिंदे सरकार धावून आले आहे. आज मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्या नंतर नवीन मंत्रीमंडळाची पहिली बैठक पार पडली, त्यात दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13600 रुपये मदत स्वरूपात देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. अर्थातच हेक्टरी मदतीची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  ‘आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात पंचनामे झाले आहेत. काही ठिकाणी आणखी पंचनामे सुरु आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शिवसेना आणि भाजपच्या सरकारने निर्णय घेतला आहे.”असे ते यावेळी म्हणाले.



“आतापर्यंत इतकी कधीच नुकसान भरपाई मिळाली नव्हती, इतकी देण्याचा निर्णय झाला आहे.  एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढून तीन हेक्टर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल.” असेही ते म्हणाले. 

एनडीआरफच्या निकषानुसार, शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार 800 रुपये मिळतात. शिंदे सरकारकडून याच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या निर्णायानुसार शेतकऱ्यांना आता 13, 600 रुपये मिळणार आहेत.  

शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा एक मोठा निर्णय आहे, आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.