पवार कुटुंबात ‘गृह’कलह, अजित पवारांवर भरवसा नाय काय?

पुणे : पवार कुटुंबातील गृहकलह नवा नाही. सुप्रिया सुळे यांनीच टि्वट करून पक्ष आणि घरात फुट असे म्हटले हाेते. पण अजित पवार यांच्या विधानाने त्यानंतरही पवार कुटुंबात सर्व आलबेल नसल्याचे समाेर आले आहे. खुद्द अजित पवार यांनीच आपल्याला गृहमंत्रीपद हवे हाेते मात्र दिले गेले नाही असे म्हटले आहे.



पुण्यात एका कार्यक्रमात बाेलताना पवार म्हणाले, राज्यात सरकार आल्यानंतर मला उपमुख्यमंत्री केलं. मी वरिष्ठांना म्हटलं की मला गृहखातं द्या. पण तेव्हा ते अनिल देशमुखांना दिलं गेलं. नंतर पुन्हा मी गृहखातं मागितलं. तर तेव्हा ते दिलीप वळसे पाटलांना दिलं. कदाचित वरिष्ठांनाही वाटलं असेल की याला गृहमंत्री केलं तर हा आपलंही ऐकणार नाही.

फटकळ स्वभावाचे मानल्या जाणाऱ्या अजित पवार यांनी पक्षाचे वरिष्ठ म्हणत शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. अजित पवारांनी दाेन वेळा गायब हाेऊन दिलेल्या धाेक्यामुळेच तर पवारांनी गृह विभागासारखे महत्वाचे खाते त्यांना दिले नाही, अशी चर्चाही त्यावेळी रंगली हाेती. गृह विभाग ताब्यात आल्यावर अजित पवार स्वपक्षीयांच्याच कुंडल्या बनवितील अशी भीतीही पवारांना वाटत असावी. चर्चा अशीही रंगली आहे की खुद्द शरद पवारांचाच अजित पवारांवर भरवसा नाय का?

अजित पवारांच्या या विधानावर खोचक टोला लगावताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की “दादा… तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. पण हे म्हणजे मढ्यामागून रडं असा प्रकार झाला.