कोणतीही कारवाई राजकीय सुडापोटी केली जाणार नाही; आव्हाडांवरील कारवाईवर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातारण तापले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातारण तापले आहे. यावर सगळेच राजकीय पक्षच नेते आपली प्रतिक्रिया देत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, ”जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहित नाही. परंतु, या प्रकरणात पोलिस नियमानुसार चौकशी करतील. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल तर पोलिस आपले काम करतील. आम्ही कोणत्याही राजकीय सुडापोटी कारवाई करत नाही.”  

काय आहे प्रकरण?

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. पीडित महिलेने दावा केला आहे की, उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला होण्यास सांगितले.

त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी महिलेला तक्रार दाखल करण्याचे सुचवले. याप्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.