केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचा या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बजेटमध्ये आम आदमीसाठी काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी 11 वाजता निर्मला सीतारामण आपला अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी त्यांच्या पेटाऱ्यात काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे या राज्यांवर केंद्राची मेहरनजर असणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अर्थसंकल्पात सरकारचे संपूर्ण लक्ष आत्मनिर्भर भारतावर असेल. देशातील उत्पादन वाढवण्यासाठी आणि अनावश्यक वस्तूंची आयात कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. यामुळे व्यापारात संतुलन तर येईलच, पण चालू खात्यातील तूटही कमी होईल. ज्या वस्तूंची आयात करणं आवश्यक नाही अशा वस्तूंची यादी विविध मंत्रालयांनी पाठवली आहे. या यादीत 35 वस्तूंचा/नावांचा समावेश आहे.
गेल्या अनेक अर्थसंकल्पातून आयकर सूट सवलतीबाबत नोकरदार वर्गाच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी आयकर सवलतीची व्याप्ती लहान व्यावसायिक तसेच नोकरदारांना वाढण्याची आशा आहे. गेल्या नऊ वर्षांपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही.यावेळी आयकर सवलत ही 5 लाखाच्या वर जाऊ शकते. तसेच न्यू टॅक्स सिस्टिमला आकर्षक बनवण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. म्हणजे न्यू टॅक्स सिस्टिममध्ये गृहकर्ज आणि मेडिकल इन्श्यूरन्सशी संबंधित सवलत सामील केली जाऊ शकते.
