आप्पासाहेब धर्माधिकारींना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले असून, आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड जनआंदोलन उभे करेल. तसेच त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तात्काळ मागे घ्या, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांना सदर मागणीचे निवेदन आज संभाजी ब्रिगेड कडून पाठवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले असून, आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड, जनआंदोलन उभे करेल. तसंच त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना सर्व सरकारांनी जाणीवपूर्वक एका विशिष्ट जातीतील लोकांनाच प्राधान्य देत हे पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे राज्यात कोणत्याच प्रकारचे कार्य नसताना देखील त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार का दिला जातोय? असा सवाल करत संभाजी ब्रिगेडकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केला जातोय.