उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायची घाई केली – छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर आज काही प्रश्न हे वेगळ्या मार्गावर गेले असते. पण जर तरला अर्थ नसतो ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

छगन भूजबळ म्हणाले की सध्या राज्यभरातून उद्धव ठाकरे यांच्यामागे सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळेल. परंतु सत्तासंघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी घाई केली नसती तर आज परिस्थिती वेगळी असती. परंतु जर आणि तरला काहीही अर्थ नाही. मतदार ठाकरेंसोबत आहेत, असा विश्वास भूजबळांनी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयातील लढाईसंदर्भात भूजबळ म्हणाले की वकील वेगवेगळे मुद्दे उपस्थित करीत आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे. येत्या दोन-तीन दिवसांत निकाल येईल असं ते म्हणाले.एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करुन घ्यावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. शरद पवार यांच्या घरावही त्यामुळे हल्ला झाला. ही मागणी सरकारने गांभीर्याने घेऊन विलिनीकरण करुन घ्यावे अशी मागणी छगन भूजबळ यांनी केली आहे.