चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार अश्विनी जगतापांच्या प्रचारासाठी गुरूवारी दिवसभर त्यांनी मतदारसंघात मॅरेथॉन दौरा केला. खरं तर ही लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्यानं, आपण बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केली होती. पण अखेर निवडणूक लागली. त्यामुळं 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
चिंचवड विधानसभेत भाजप प्रदेशाध्यक्षांकडून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत तब्बल सतरा ठिकाणी ते प्रचार करणार आहेत. अश्विनी जगतापांना निवडून आणण्यासाठी भाजपाचे सर्वजण जोरात प्रचार करत आहेत. सगळे कामाला लागले आहेत. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.चिंचवड विधानसभेत भाजप प्रदेशाध्यक्षांकडून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत तब्बल सतरा ठिकाणी ते प्रचार करणार आहेत. अश्विनी जगतापांना निवडून आणण्यासाठी भाजपचे दिग्गज कंबर कसत आहेत.
