महिला भारतीय संघाचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि वेस्ट इंडिमधील सामन्यात महिला भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 119 धावांचा पाठलाग करताना 6 विकेट्सने मात केली आहे. भारताची युवा खेळाडू रिचा घोषने केलेल्या 32 चेंडूत नाबाद 44 धावांच्या जोरावर दुसरा विजय मिळवत आपली घौडदौड कायम ठेवली आहे. चौथ्या विकेटसाठी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत विजयाचा पाया रचला.

स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी ताबोडतोड सुरुवात करुन दिली. पहिल्या दोन षटकांत धावांचा पाऊस पाडला. पण चौथ्या षटकात स्मृतीला बाद करत विडिंजने पहिले यश मिळवले. त्यानंतर जेमिमा आणि शेफाली वर्माही लागोपाठ बाद झाल्या. 40 धावांत भारताने तीन विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने ऋचा घोष हिच्यासोबत भारताचा डाव सावरला. हरमनप्रीतने 33 धावांची खेळी केली. तर ऋचा घोष हिने नाबाद 44 धावांची खेळी केली.

याआधी रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करून विश्वचषक 2023 मधील पहिला विजय नोंदवला होता. या विजयानंतरही भारतीय संघ 4 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडनेही आपले दोन्ही सामने जिंकले आहेत पण त्यांचे नेट रनरेट भारतापेक्षा जास्त आहे.