वैफल्यग्रस्त उध्दव ठाकरे यांचा लाेकशाहीच्या स्तंभारवरच हल्ला; निवडणूक आयाेगाच्या बरखास्तीची मागणी

निवडणूक आयाेगाने कायद्याचा अन्वयार्थ लावून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयाेगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या उध्दव ठाकरे यांनी थेट लाेकशाहीच्या या स्तंभावरच हल्ला केला आहे. निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे. निवडणूक आयोगाच्या पण नियुक्त्या निवडणुकीनं व्हायला हव्यात. त्यात पारदर्शीपणा हवा, असे म्हटले आहे.

भारतीय निवडणूक आयोग ही  एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. घटनेच्या कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. या घटनात्मक स्तंभावरच ठाकरे यांनी टीका केली आहे.आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात. त्याजागी निवडणुकीने नियुक्त्या व्हाव्यात, ही मागणी अत्यंत हास्यास्पद असल्याची टीकाही केली जात आहवास्तविक निवडणूक आयाेगाने शिवसेनेतील सत्तासंघर्षावर निकाल देताना कायद्याच्या सर्व कलमांचा हवाला दिला आहे. पूर्वीच्या खटल्यांचाही संदर्भ दिला आहे. मात्र, तरीही या निर्णयाला उध्दव ठाकरे विराेध