व्हिप बजावणार, पाळला नाही तर कारवाई हाेणार – भरत गाेगावले

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार चांगलेच संकटात सापडणार आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावणार आहे. जे आमदार व्हिप पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई हाेणार असल्याचा इशारा शिवसेनेचे प्रताेद भरत गाेगावले यांनी दिला आहे.निवडणूक आयाेगाने एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत ठरविल्याने आता ठाकरे गटाच्या आमदारांसमाेर नवे संकट उभे राहिले आहे. त्यांची संख्या कमीअसल्याने शिवसेनेसाेबत राहण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

त्याचबराेबर पक्षाच्या बैठकीपासून ते विधानसभेत मतदानापर्यंत पक्षाच्या प्रताेदांनी बजावलेला व्हिपही त्यांना मानावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर गाेगावले म्हणाले, पक्षाच्या अधिपत्याखाली सर्वांना आणण्यासाठी व्हीप बजावला जाताे. सर्व आमदारांची तो स्वीकारायचा असतो. जर स्वीकारला कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देतील. कारवाई काय होईल हे आता सांगणार नाहीसंजय राऊत यांच्यावर टीका करताना गाेगावले म्हणाले, संजय राऊत चांगले काम करतायत. उद्धव ठाकरेंना संपवायचं. तेच आम्हाला फायद्याचं ठरत चाललेलं आहे.आणखी बरेचसे गुन्हे संजय राऊतांवर दाखल होतील.