”उद्धव ठाकरे यांच्याकडे ठरविक शब्दांची ‘डिक्शनरी’ (शब्दकोष) आहे. त्यातीलच शब्द ते फिरवून-फिरवून वापरत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही,” या शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारविषयी केलेल्या विधानांवरून फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी माध्यमांमध्ये दिलेल्या विधानांसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस बोलत होते. ”संजय राऊत हे रोज निर्बुंद्धांसारखी विधाने करतात, त्यांना काय उत्तर द्यायचे. अशांच्या बुद्धीची लोक किव करीत असतात, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, ”१२ आमदारांसंदर्भातील पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिले होते, अजित पवारांनी नाही. राज्यपालांची मुलाखत मी संपूर्ण पाहिली नाही. पण, ते जे बोलले त्यातील बाबी सत्य आहेत. या पत्रानंतर काही नेते त्यांना भेटायला गेले, तेव्हा राज्यपालांनी त्यांना स्पष्टच सांगितले होते की, योग्य प्रारुपात पत्र पाठवा, अशा धमक्यांच्या पत्रावर मी निर्णय घेणार नाही. पण, मविआचा अहंकार आडवा आला आणि त्यांनी सांगितले की आम्ही ते पत्र बदलणार नाही.
