अर्थसंकल्पात शहरी भाग, कृषी क्षेत्रावर भर देण्यात येण्याची शक्यता

‘यंदाचा अर्धसंकल्प विशेष असणार आहे. हा महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प आणि जनसंकल्प असेल असे उपमुख्यमंत्री,’असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. या अर्धसंकल्पात शेतकरी वर्गाला खुश करण्यावर भर दिला जाणार आहे. पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

गेल्या दोन आठ्वड्यापासुन मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी अर्थसंकल्पाच्या संदर्भात विविध पातळ्यांवर चर्चा करून कोणत्या गोष्टी करायला हव्यात याचा आढावा घेत आहेत. सर्व मंत्री,सचिव,उद्योग संघटनांशी अर्थसंकल्पपूर्व बैठका घेतल्या आहेत. राज्याची अर्थव्यवस्था फारशी सक्षम नाही.कोरोनाकाळात गेले दोन वर्षे राज्याचा अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून घसरली. त्यातून सावरत नैसर्गिक आपत्तीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला.

मोठ्या शहरांप्रमाणे मध्यम आणि छोट्या शहरांच्या विकासाकरिता निधीची तरतूद केली जाईल.याशिवाय कृषी क्षेत्रांवर अधिक तरतुदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्जाचे हातपे भरण्यासाठी अधिक सुटसुटीतपणा, वीज बिलासाठी अभय योजना असे काही उपाय योजण्यात येणार आहे.राज्याची अर्थव्यवस्था अधिक व्यापक करण्याकडे देवेंद्र फडणवीस यांचा भर आहे.