अलीबागमधील कोर्लई येथील 19 बंगले रश्मी ठाकरेंच्या नावाने अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण नंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केला की, हे बंगले पाडण्यात आले. त्यांतर आता या कोर्लई गावातील कथित 19 बंगले घोटाळा प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे. काल रात्री 10 साडे आठ वाजता पोलिसांनी मिसाळांवर अटकेची कारवाई केली. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सोमय्या यांनी या प्रकरणात आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात या जमीनी संदर्भात काही व्यवहार झाले होते. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर, मनीषा वायकर यांच्या नावावर मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात जमीन खरेदी केली होती. या जागेवर 19 बंगले होते, पण त्यांची नोंद कॅन्सल केल्याचा आरोप आहे.
रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी 2014 मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई गावातील जागा तिथे झालेल्या बांधकामासह विकत घेतली. या जागेवर 19 बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायतीत होती. त्याची घरपट्टी अन्वय नाईक भरायचे, असा आरोप आहे.
सोमय्यांनी आजपर्यंत अनेकांवर आरोप केले होते. त्यापैकी अनेकांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला होता. कोर्लई 19 बंगल्यांच्या प्रकणात सोमय्यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्यावरच आरोप केल्यानंतर आता माजी सरंपचाला अटक केली. त्यामळे पोलिसांचा तपास रश्मी ठाकरेंपर्यंत येणार का, हेच पाहणं औत्सुक्याच आहे.
