तुमची गुणपत्रिका नापासचीच येणार; सुधीर मुनगंटीवारांचा राष्ट्रवादीला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी हा धक्कादायक निकाल आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या निर्णयात धक्कादायक असं काहीच नाही. समजा परीक्षा देताना सहा पेपर द्यावे लागतात, आपण त्यापैकी दोनच पेपर दिले तर गुणपत्रिका नापसचीच येणार आहे. त्यामुळे या निकालाला धक्कादायक कसं म्हणणार नाही.

मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या देशात कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी जे निकष आहेत त्यात एखाद्या पक्षाने किती राज्यांमध्ये निवडणूक लढवावी. किती राज्यांमध्ये किती टक्के मतं घ्यावी यासंबंधीचे निकष असतात. त्यावर ठरतं तुमच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा की नाही. ही मतं घेतली नाही तर हा निर्णय धक्कादायक कसा काय? पेपर न देता मेरिटची गुणपत्रिका येणार आहे का? त्यामुळे या निकालात धक्कादायक असं काही नाही हा प्रक्रियेचा एक भाग आहे.