गोंदिया : शिवसेना सोबत राष्ट्रवादी काँग्रेसछा वाद सुरू असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात जुंपली आहे. राष्ट्रवादी शेतकरी विरोधी असल्याचे नानांनी म्हटले आहे तर माध्यमांसमोर नाही बैठकीत बोला असा सल्ला अजितदादांनी दिला आहे.
नाना पटोले यांनी गोंदिया बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाबरोबर युती करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसही शेतकरीविरोधी असेल, अशी टीका केली. यानंतर अजित पवार यांनी नाना पटोलेंच्या आरोप आणि टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच नाना पटोले नेहमी अशाप्रकारची वक्तव्य करतात, असा आरोप केला.
अजित पवार म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमी अशाप्रकारची वक्तव्ये करतात. अनेकदा आम्हालाही काही माहिती मिळते. अशी वक्तव्य केल्याने कारण नसताना महाविकास आघाडीमध्ये अंतर पडू शकतं. नाना पटोलेंनी या गोष्टी माध्यमांमध्ये बोलण्याऐवजी जयंत पाटील यांच्याशी बोलावं. माझ्याशी बोलावं. उद्धव ठाकरेंशी बोलावं, आदित्य ठाकरेंशी बोलावं. त्यातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे या गोष्टी बंद केल्या पाहिजे. मविआची सभा होईल तेव्हा मी जरूर या गोष्टी तिथं मांडेल.
