मातोश्रीवरून बाहेर कोणी बैठकीला जात नव्हते, उद्धव ठाकरे यांच्या सिल्वर ओक भेटीवरून बावनकुळे यांचा टोला

मुंबई : मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घाईघाईत सिल्वर ओकला जाऊन त्यांची भेट घेतली. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ठाकरे यांना टोला मारला आहे. मातोश्री वरून बाहेर कुणी बैठकीला जात नव्हते असा शालजोडीतील टोला त्यांनी मारला.पत्रकारांची बोलताना बावनकुळे म्हणाले आजपर्यंत लोक त्यांना मातोश्रीवर भेटायला जात होते. मातोश्री वरून कोणी बाहेर बैठकीला जात नव्हते. यावरून त्यांची हतबलता दिसते आहे.

आमच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका टिप्पणी केल्यास सहन केली जाणार नाही. आमचे कार्यकर्तेही त्याला उत्तर देतील असा इशारा बावनकुळे यांनी दिला.संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, 100 दिवस जेल मध्ये राहून ते अनेक भाषा शिकलेत. येणारी पिढी हे पाहतेय. त्यांनी भाषा सुधारावी इतकंच आम्ही म्हणू शकतो. यातून येणाऱ्या पिढीला संस्कार देणार हा प्रश्न आहे. सत्ता गेल्याने हे रिकामे आहेत. बावचळले आहेत.

अजित पवार भाजप मध्ये जाणार या जर तर ला महत्व नाही. राष्ट्रवादीच्या किंवा कुणाचाही पाठिंब्याची गरज नाही आम्ही मजबूत आहोत निकाल काहीही आला तरी आमचा आकडा तयार आहे. 184 चा आकडा कसाही येईल पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे विचार चांगले आहेत. दोघांचे मनोमिलन आमच्यासाठी आनंददायी आहे. पंकजा आणि धनंजय सोबत आले तर आम्हाला अत्यंत आनंद होईल.आज उद्या काहीही होऊ शकते, असेही बावनकुळे म्हणाले.चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बाळासाहेबांची भूमिका ही आम्हाला मान्य आहे, आम्ही पक्ष म्हणून सांगितलं. त्यांच्या शब्दांचा विपर्यास केला गेला.त्यानंतर पुन्हा पुन्हा वक्तव्य संजय राऊत करताय, ते आंतरराष्ट्रीय नेते आहेत मात्र सलग शिवराळ भाषेत टीका करणे आणि राज्याची संस्कृती धुळीस मिळवणे योग्य नाही, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला.