पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजप सोबत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतत प्रचारकांच्या यादीत अजित पवार यांचे नाव नाही. यामुळे पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. त्यातच अजितदादांनी पुण्यातील आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात अजित पवार यांचे नाव नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यांसह १५ जणांना स्टार प्रचारक केले आहे. परंतु अजित पवार यांचे नाव नसल्याने चर्चा सुरु झाली आहे.
कर्नाटक विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी प्रचार सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या भागात पवार यांच्या सभा होतील अशी शक्यता होती. मात्र स्टार प्रचारक यादीतून त्यांचे नाव वगळले आहे.
