पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज (30 एप्रिल) प्रसारित होणार आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी सरकार आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. 100 वा भाग आज सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. ‘मन की बात’च्या शंभराव्या भागापूर्वी एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करताना कोणती तयारी केली जाते हे दाखवण्यात आलं आहे.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबर 2014 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. याआधीचा एपिसोड २६ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या रविवारी ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. ज्याचं प्रसारण डीडी नेटवर्कवरही केलं जातं. फक्त 30 मिनिटांचा हा कार्यक्रम. आज 30 एप्रिल रोजी याचे 100 एपिसोड पूर्ण होणार आहे. त्याआधी पीएम मोदींच्या या मन की बातचा देशावर नक्की काय परिणाम झाला, याचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.
मन की बातचा 100 वा भाग संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने ट्विट केले की, ऐतिहासिक क्षणासाठी सज्ज व्हा. पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी युनायटेड नेशन्स मुख्यालयातील ट्रस्टीशिप कौन्सिल चेंबरमधून थेट प्रक्षेपित केला जाईल.न्यूयॉर्कमध्ये रविवारी रात्री 1.30 वाजता प्रक्षेपण होणार आहे. यूएन मुख्यालयात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ही एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व घटना असेल, असे भारतीय मिशनने म्हटले आहे.
“दुसऱ्या देशातील भारतीय राजदुतांवरही ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मन की बातचा हा कार्यक्रम राजभवनात होणार असून पद्म पुरस्कार विजेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे”, अशीही माहिती देण्यात आली.दुष्यंत गौतम यांनी सांगितलं की, “सत्तेत आल्यानंतर ऑक्टोबर २०१४ पासून मन की बातला ५२ भारतीय भाषा आणि ११ परदेशी भाषांमध्ये प्रसारित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावरील विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रियाही भाजपा नेत्यांकडून येत आहे.”
