देशात नुकतेच चार राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या परिणामी महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका तसेच लोकसभा-विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक कार्यकर्ते पदभ्रमंतीसाठी पक्षप्रवेश करत असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा आधार घेण्यासाठी सत्तेत राहून जनतेची कामे करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातून भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होताना दिसत आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आगामी जिल्हा परिषद,महापालिका,विधानसभा तसेच लोकसभा निवडणूकांचे वेध लागले त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे सर्वच पक्ष संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
तसेच सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने चर्चा रंगल्या होत्या. मात्र याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र ते परवानगी घेवूनच गेल्याचे मोठे विधान केले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या यामध्ये त्यांनी सोलापूरमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मोठे विधान केले आहे
जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शिंदे गटात गेलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे तात्पुरत्या काळासाठी गेले आहेत शिंदे गटाची जोपर्यंत सत्ता आहे तो पर्यंत काही सोयी सवलती मिळतील म्हणून ते शिंदे गटात गेले आहे तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की एका कार्यकर्त्याने साहेब सहा महिने जातो निधी घेऊन येतो, निधी मिळाल्यावर परत येतो अशी परवानगी घेतल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. जयंत पाटील यांच्या या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
