पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो – चंद्रशेखर बावनकुळे

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजप विषयी त्यांच्या मनात असणारी खदखद बोलून दाखवली. यावेळी त्यांनी, मी भाजपात आहे. भाजप थोडीच माझा आहे, असं विधान केलं त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता राज्यात त्यांचाबाबत अनेक चर्चा होताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेतर ऑफरच दिली आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समोर येत यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केला गेला. मी त्यांचा संपूर्ण भाषण ऐकलेलं आहे. पंकजाताई यांनी भाजप बद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले आहे. तर पंकजाताई भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूकीचं असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केला गेला आहे. मी त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले आहे. पंकजाताईंनी खरंतर भारतीय जनता पक्षाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमी विपर्यास करणे योग्य नाही.पंकजाताई आज महाराष्ट्रात फिरत असून जनसंपर्क अभियनात सहभागी झाल्या आहेत. मध्य प्रदेशात त्यांच्या 15 पेक्षा जास्त सभा होणार आहेत. काहीतरी मुद्दा घेऊन राज्यात संभ्रम निर्माण केला जात आहे. त्या काही बोलल्या की त्याचा विपर्यास केला जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.

भाजपमधील इनकमिंगविषयी बोलताना आमचा पक्ष महासागर असल्याचं बावनकुळे म्हणाले. “आमचा पक्ष महासागर आहे, अरबी समुद्रासारखा आहे. या महासागरामध्ये कितीही लहान, कितीही मोठा, कोणत्याही पक्षातला नेतृत्व आला तरी आमच्याकडे खूप स्पेस आहे. आमच्याकडे समाजातील प्रत्येक घटकासाठीचे वेगवेगळे सेल आहेत. पस्तीस प्रकोष्ठ आहे. किसान आघाडी, महिला आघाडीसारख्या नऊ आघाड्या आहेत. 48 लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 288 जागा युती म्हणून लढायच्या आहे. त्यामुळे कोणीही पक्षात आला तरी त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम देण्यासाठी आमच्याकडे स्पेस आहे, जागा आहे. ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या नेत्यांना भाजपमध्ये यायचं असेल, माझी त्यांना विनंती आहे, त्यांनी भाजपमध्ये यावं आम्ही महासागरासारखं त्यांना सामावून घेऊ,” असं बावनकुळे यांनी म्हटलं.