सध्या कोल्हापूर एस टी को ऑप बँक निवडणुकी रणधुमाळी सुरु आहे. या निवडकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते देखील मैदानात उतरले आहेत. आज कोल्हपूरयेथे पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्तेनीं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष केले.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू झाल्यानंतर शरद पवार हे कधी कष्टकऱ्यांच्या घरी गेलेत का, असा सवाल उपस्थित करून पवारांच्यामुळे राज्यातील 124 एसटी कर्मचारी गतप्राण झाले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे जसे कष्टकऱ्यांच्या घरी गेले नाहीत, त्याच प्रमाणे त्यांनी कधी सर्वसामान्यांनाही कधी समजून घेतले नाही. त्यामुळे आताच्या काळात शरद पवार म्हणजे हे वैचारिक व्हायरस असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. यावेळी पवारांना सूचक इशारा देत त्यांनी म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात आमचे कष्टकरी कुणालाही घाबरून काम करत नाही असा त्यांनी कर्मचाऱ्यांविषयी विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणतात.. 33 हजार मराठा आज आमच्या सोबत आहे. आम्ही सर्वाधिक उमेदवार दिले आहेत. कोल्हापूरमध्ये जे आम्ही पाहिलं , काही हिंदू तरुण लांबून पाहत होते त्यांची गुन्ह्यात नावं आली आहेत. याबाबत मी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. हसन मुश्रीफ यांचे देखील आम्ही काही चालू देणार नाही. पहिल्यांदा ही भूमिका आम्ही घेतली आहे. बदला बदलीच राजकारण फक्त शरद पवारांच्या डोक्यात असते. पण त्यांनी भाकरीचा अपमान केलेला आहे. त्यांना जे म्हणतात ना स्वार्थ जागा झाला म्हणून अजित पवारांची झोप उडाली आहे. राजकारणासाठी भाकर वापरायची नसते ती या भूमातेतून आलेली आहे, असे देखील ते म्हणाले
