मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब लाचार झाले नाही; शिंदेंचा अपमान झाला म्हणून ते बाहेर पडले-दीपक केसरकर

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंड पुकारत 40 आमदारांसह स्वत:चा वेगळा गट तयार केला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार ठाकरे गटाकडून आणि विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.अशामध्ये मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका करणाऱ्या ठाकरे गटाला राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद काढून घेण्याचा प्रयत्न झाला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी होऊन राज्यातलं ठाकरे सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आलं. 40 आमदार आणि 13 खासदार शिंदे गटात सामील झाले. यानंतर शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन गटांमध्ये अभूतपूर्व असं आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण राज्यात पाहायला मिळत आहे. शिवसेनेत असताना कशा प्रकारे अन्याय होत होता, याचे अनेक दावे शिंदे गटातील आमदार-खासदारांनी केले. यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत असतानाचा एक प्रसंगही सांगितला आहे. तसेच, केसरकरांनी संजय राऊतांवरही टीका केली आहे.

शिंदे गट शिवसेना मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.भाजपासोबत जाण्याची तुमची इच्छा नव्हती. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे होते.राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरलात.असा टोला त्यांनी लगावला. तसंच संजय राऊत म्हणाले होते की 40 लोकांचे मुडदे पाडणार. शिंदे साहेबांचा अपमान झाला म्हणून ते शिवसेनेतून बाहेर पडले. मी नामर्दाकडून मरणार नाही मी स्वतः ला संपवणार असा बोलणारा आमचा नेता आहे. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करणारा ते खरा शिवसैनिक आहेत. जनतेने युतीला मतदान दिलं होतं

यावेळी मुख्यमंत्री रात्री 2 वाजेपर्यंत काम करतात असं सांगताना केसरकरांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.जे लोक झोपतात ते स्वप्न बघतात जे लोक काम करतात ते दिवसरात्र धावत राहतात. म्हणून आमचे मुख्यमंत्री झोपत नाहीत रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत काम करतात. आम्ही सकाळी 11-12 वाजता कार्यक्रम करणारे लोक नाहीत आम्ही जनतेतले लोक आहोत जनतेची सेवा करणारे लोक आहोत म्हणून आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत असं दीपक केसरकर म्हणाले.

मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं हे दोन दिवसांत सांगेन एकनाथ शिंदेंचा अपमान झाला होता. जेव्हा उद्धव ठाकरेंनी विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवंय का? तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं की आपण शिवसेनेसाठी केलेल्या त्यागाची किंमत अशा रीतीने केली जात आहे. मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं याचा खुलासा येत्या दोन-चार दिवसांत मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून करणार आहे असा इशारा दीपक केसरकरांनी यावेळी बोलताना दिला.