राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावेळी आणि वर्धापनदिनावेळी दिसलेली अवस्था पाहता सध्या शितयुद्ध सुरू आहे, काही दिवसांनी टोळीयुद्ध सुरू होईल, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.
शेलार म्हणाले, पवार साहेबांनी ज्यावेळी राजीनामा दिला, त्यावेळी अजित दादा एका बाजूला आणि बाकीचे कार्यकर्ते बोलत होते ते दुसऱ्या बाजूला. त्यावेळी वाकयुद्ध सुरू होते. आता शितयुद्ध सुरू आहे आणि काही दिवसांनी टोळी युद्ध पाहायला मिळेल.
सुप्रिया ताईंनी आपल्याल मिळालेल्या पदाच्या खाली सुरुंग तर लावलेला नाही ना, याचा विचार करावा. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलावे अशी टीकाही शेलार यांनी पवार कुटुंबियांवर केली.
