बऱ्याच दिवसांपासून पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. वाढलेल्या उकाड्यापासून दिलास देत विदर्भातील काही भागात मान्सून दाखल झाला आहे. विदर्भात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट होती. आता या मान्सूनच्या आगमनामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. विदर्भाच्या काही भागांत मान्सून दाखल झालाय. भारतीय हवामान खात्याने याची अधिकृत घोषणा केलीय. आठवडाभरापासून विदर्भात उष्णतेची लाट होती. मान्सूनमुळे उष्णतेचा ताप कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात पुढील ५ दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज तसेच पूर्व विदर्भात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात आज मान्सूनचे आगमन झाले आहे. पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावससाठी पारिस्थिती अनुकूल होत आहे. तर, पहिल्या आठवड्यात मध्य भारतात चांगला पाऊस पडेल. दुसऱ्या आठवड्यातही मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाचा मूड बदलल्याने वातावरणात गारवा येत आहे. विदर्भात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. दरम्यान विदर्भात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व विदर्भात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले होते. आता कोकणात 24 तासात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनने विदर्भासह कर्नाटक, तेलंगना , छत्तीसगढ, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागात मान्सून पोहचला आहे. एकूणच मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूरचा भाग देखील काही भाग देखील मान्सूनने व्यापला आहे. पुढील ४८ तासांमध्ये विरर्भातील काही भाग, मराठवाडा आणि मध्यमाहाराष्ट्रात देकील मान्सूची प्रगती पाहायला मिळेल. यासोबतच ४८ तासत मान्सून मुंबईत देखील दाखल होईल.
