आता राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याच्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार हे भाजपसोबत येतील याबाबत कल्पना होती का यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, कुणालाच कल्पना नव्हती, मात्र दोन महिन्यापूर्वीच तुम्हाला अंदाज सांगितलं होता, तो खरा ठरला अस मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील काँग्रेसचे अनेक आमदार सध्या वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. ते कुणाला पाठिंबा देतील, सांगता येत नाही. परंतु काँग्रेसचे आमदार सरकारमध्ये येणार असल्याचं निश्चित असल्याचा दावाही गुलाबराव पाटलांनी केला आहे. त्यामुळं आता राज्यात आणखी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होतील, असं वाटलं होतं, परंतु त्याची माहिती माझ्याकडे नव्हती, असंही गुलाबराव पाटलांनी दिली आहे. सत्ताधारी नेत्यांकडून धक्कादायक दावे करण्यात येत असल्याने काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.
गेल्यावेळी मी नगर येथील सभेत सांगितलं होत की, विखे पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढेल. त्याप्रमाणे ते भाजपकडून निवडणूक लढले. त्यांनतर मी दोन महिन्यापासून सांगत होतो की, अजित पवार आपल्याकडे येतील ते आले, असे पाटील म्हणाले. आता काँग्रेसवाले येतील ते पण बघा, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. याबाबत काँगेस आमदारांची काही चर्चा झाली आहे का? असं विचारलं असता, काहीच चर्चा झाली नसल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील भाजपात येणार असल्याचा दावा मी केला होता, तसेच अजित पवार सरकारमध्ये सहभागी होतील, असाही दावा मीच केला होता. तो आता खरा ठरला आहे. त्यामुळं आता काँग्रेसचे अनेक आमदार फुटणार असल्याची मला माहिती आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी अन् आता काँग्रेसचा नंबर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
