राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन गट निर्माण झाले आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा असंतोष निर्माण झाल्याचं चर्चा विरोधकांकडून घडवल्या जात असल्याचं बोललं जात आहे.अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. या दौऱ्यातील त्यांची पहिली सभा भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात पार पडली. यावेळी शरद पवार यांचा पुन्हा एकदा पावसात भिजलेला फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
पावसात आम्हीही भिजतो. साहेबांचं वय झालं आहे, आजारपण आहे, त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळते.आम्ही सुद्धा शिवसेनेत असताना पहाटेपर्यंत काम करायचो. मागच्या निवडणुकीत सुद्धा प्रचंड पावसात आम्ही बैठका घेतल्या. हा काही नवीन भाग नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ नाशिकहून पुण्याकडे निघाले होते, यावेळी त्यांचं संगमनेरमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
काय म्हणाले भाजपचे जेष्ठ नेते चंद्रराव तावरे
शरद पवारांनी अनेकदा फोडाफोडीचं राजकारण केलं, परंतु आता ते पवार कुटुंबियांना वाचवण्यासाठी पक्षात फूट पडत असल्याचं दाखवत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीचं हे नाटक सुरू असणार आहे. तोपर्यंत सर्व प्रकरणांतून क्लीनचिट मिळवायची हा राष्ट्रवादीचा डाव असल्याचाही दावा चंद्रराव तावरे यांनी केला आहे.
मंत्री छगन भुजबळ बोलताना म्हणाले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावर बोलताना भाजपचं सुद्धा मुंडे कुटुंब या लोकांनी फोडलं होतं.धनंजय मुंडेंना तुम्हीच दूर केलं होतना असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
