माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती. देवेंद्र फडणवीस हे मस्टर मंत्री असल्याची घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरे यांची ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईसाठी आम्ही काय केलं हे विचारणारे तुम्ही कोण? आमचे मामा की काका? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार म्हणाले की, म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले? मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचारा ना… त्यांनी साठ वर्षात काय केले? तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा?तसेच मुंबईसाठी आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे…त्यांना सगळा हिशेब देऊच.
आशिष शेलार म्हणाले, भाषणात उद्धव ठाकरे म्हणे की इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले? मैत्री दिनानिमित्त हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना त्यांनी साठ वर्षात काय केले? तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा? मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशात विकास तर इंग्रजांनी पण केला पण म्हणून त्यांना कुणी चांगले म्हणत नाही. भाजप तर नेहरूंपासून झालेला विकासही नाकारत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना म्हणजे भ्रमाचा भोपळा आहे.अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
