पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; करणार विकास प्रकल्पांचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, २६ ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी शिर्डीत दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डीत पोहोचणार आहेत. पंतप्रधान मोदी दुपारी १ वाजता शिर्डी येथे पोहोचतील. पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन मंदिरात पूजाही करणार आहेत. दिवसभर सामान्य भक्तांना साईमंदिरात दर्शन नियमितपणे सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीतील साई मंदिराला भेट देणार असल्याने केवळ आर्धा तास मोदी आल्यानंतर समाधी मंदिरात प्रवेश बंदी असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दौऱ्यात दुपारी एक वाजता शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा देखील करणार आहेत. यानंतर अहमदनगर मध्ये सव्वा दोन वाजता निलवंडे धरणाचे जलपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी हे साई मंदिरात पूजा आणि दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन देखील करतील. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी राज्यात सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.

नरेंद्र मोदी शिर्डीहून गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील फतोर्डा स्टेडियमवर पंतप्रधान मोदी संध्याकाळी ६ वाजता ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोव्यात जन्मलेल्या भारतीय प्रोफेशनल विंड सर्फर कात्या इडा कोएल्हो गुरुवारी येथे ३७व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मशाल सुपूर्द करतील. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पाच तास चालणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्यात सुखविंदर सिंग आणि हेमा सरदेसाई यांच्यासह राज्यातील प्रसिद्ध कलाकार सादरीकरण करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१८ नंतर पुन्हा एकदा शिर्डीच्या दौऱ्यावर येत असून दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बैठकांचा सपाटा सुरु आहे.