बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाची बातमी राज्यभर पसरली. शिर्डी येथील कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबा महाराज सातारकर यांच्या.पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. मुंबईतील नेरूळ येथील बाबा महाराजांच्या निवासस्थानी दर्शन घेतले. त्यांनी दर्शन घेऊन बाबा महाराज सातारकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, बाबा महाराज सातारकर यांनी स्वतःला आध्यात्मिकतेमध्ये झोकून घेतले होते. त्यांच्या कार्याची ख्याती संपूर्ण जगभर पसरली आहे. समाजप्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले. बाबा महाराजाचे जाणे हे मनाला चटका लावून जाणारे असल्याच्या भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. बाबा महाराज सातारकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
