मी नाराज नाही, मात्र तिकीट न मिळाल्यामुळे मला खंत वाटली – भावना गवळी

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा नेतृत्व केल्यानंतरही शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली नाही,त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना आज भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी यवतमाळ व वाशिमचे जिल्हाप्रमुख उपस्थितीत होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक कामे मी केली. अकोला ते पूर्ण रेल मार्ग मी पुढाकार घेऊन ब्रोज गेज तयार केलं. वर्धा नांदेड रेल्वे मार्ग मी पुढाकार घेऊन काम मी केलं. मी नाराज नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. पण मला या गोष्टीची खंत आहे. मी कुठे कमी पडली हे मला पाहावं लागेल असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

यावेळी भावना गवळी म्हणाल्या प्रचाराला निघाले नाही, म्हणून मी नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण मला स्पष्ट करायचय की, नाराज होणाऱ्यापैकी मी नाही. मला खंत जरुर वाटली. मी इतके वर्ष काम केलं आहे, आणि इतके वर्ष काम केल्यानंतर एकदम कसेकाय असे होऊ शकते? अनेक जण ५ वेळा किंवा ३ वेळा निवडून आले. त्या खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली. त्यामुळे मला खंत वाटली. कदाचित थोडसं खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. शिवसेनेसाठी आमच्या घरासाठी योगदान दिलं आहे. एकनाथ शिंदेंची हात मजबूत करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचं भावना गवळी यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री माझ्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. माझ्या वडिलांनी ८५ पासून शिवसेनेचं काम केलं. आमच्या घराणे पक्षासाठी योगदान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे. जयश्री ताईंचे हात मजबूत करणार आहे. मोदींचे हात मजबूत करणार असल्याचं यावेळी भावना गवळी म्हणाल्या.२५ वर्षापासून मी काम करत आहे. मी जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं. लहानपणापासून शिवसेनेत काम करण्याचं बाळकडू होतं. काही तरी मिळतंय म्हणून मी काम करत नाही. मी २५ वर्ष खासदार आहे. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचे आहे. २५ वर्ष परिवार म्हणून मी या मतदारसंघात काम केलंय.

पक्षश्रेष्ठींचा निर्णय हा आमच्यासाठी महत्वाचा असतो. मी कॉलेजला असल्यापासून शिवसेनेचे काम करतेय. माझा मताधिक्याचा क्रम चढता आहे. सर्व्हे कधी मी केलाच नाही. न सर्व्हे करता मी इथपर्यंत पोहोचली आहे. माझी पुढची वाटचाल पक्षश्रेष्ठी ठरवतील. एवढी वर्षे भावना गवळींनी किल्ला लढवला. आता काय जबाबदारी द्यायची हे ते ठरवतील, असंही यावेळी भावना गवळी यांनी स्पष्ट केलं.