शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु आहे. नैऋत्य मोसमी वारे वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार आहे. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून १९ मे (रविवार) पर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिली. यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे. मागील वर्षी कमी झाल्यामुळे यंदा वेळेवर येणार मान्सून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
नागरिक गेले दोन महिने उकाड्याने आणि वादळी पावसामुळे हैराण झाल्यानंतर आता मान्सूनकधी येणार अशी उत्सुकता निर्माण झाली असतांना दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर १९ मे मॉन्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण हिंद महासागरात वाऱ्याची प्रती चक्रीय स्थिती निर्माण होऊन वारे उत्तरेला वाटचाल करतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे विषुववृत्त पार केल्यानंतर त्यांची वाटचाल मॉन्सूनच्या दिशेने सुरू होते. अंदमानमध्ये हे मॉन्सून वारे दाखल झाल्यावर या वाऱ्यांमुळे ढगांची निर्मिती होते अनाई पाऊस पडतो. अंदमानमध्ये सुमारे २४ तास पाऊस झालीवर मॉन्सून झाल्याचे जाहीर केले जाते.
एरवी मान्सूनचा पाऊस २१ मे च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो. अंदमानमध्ये सुमारे २४ तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते. मात्र, यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण १ जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून ८ जूनच्या आसपास सक्रिय होईल. गेल्यावर्षी राज्यात मान्सून १६ जूनला दाखल होता. परंतु, यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागरात निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहे. दरवर्षी मान्सून २२ मे पर्यंत दाखल होतो. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात. पुढील दोन दिवसांत अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे.
