विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही शिवसेना ठाकरे गट आत्मपरीक्षण करायला तयार नाही. मातोश्रीवर कोणी ताबा मारलाय म्हणत अंडीपिल्ली बाहेर काढणाऱ्या किशोर तिवारी यांची हकालपट्टी केली. (Expulsion of Kishore Tiwari from the Thackeray group, who took out )
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी मातोश्री आणि सेना भवनावर विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर या सारख्या नेत्यांनी ताबा मिळवला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराजयाची जबाबदारी निश्चित करून जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी लावणाऱ्या या नेत्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली होती. किशोर तिवारी यांनी दिलेल्या या घरच्या आहेरानंतर त्यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या संबंधात किशोर तिवारी यांनी देखील पक्षाच्या या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
किशोर तिवारी हे प्रवक्ते होते. त्यांना पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे. हकालपट्टी केल्यानंतर किशोर तिवारी यांनी हे किती योग्य आहे? असा प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंना शिवसेना मध्ये विनायक राऊत अरविंद सावंत संजय राऊत मिलिंद नार्वेकर सारख्या नेत्यांनी मातोश्री व सेना भवनावर केलेल्या ताबा मिळविला आहे. विधान सभा निवडणुकी मध्ये पराजय करण्यात जबाबदारी निश्चित न करीत जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यास लावणाऱ्या पोटभरू कावेबाज नेत्यांना हकालपट्टी करा ही मागणी आपण केली होती. जो माणूस सत्य बोलण्याचे धाडस करतो, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मागील पाच वर्षांपासून सतत राहून भाजपच्या सर्व प्रवक्त्या मंडळींनी त्यांची जागा दाखविणाऱ्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला साधी सूचना न देता सरळ हकालपट्टी किती योग्य आहे, हे आपण सांगा.
