कंकालेश्वर मंदिरावर निजाम काळापासून अत्याचार , निजामाने केले होते बंद , वक्फ बोर्डाने जमीन ताब्यात घेतली

विशेष प्रतिनिधी

बीड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्डाची दादागिरी संसदेत मांडताना बीड शहराजवळील कंकालेश्वर मंदिराचा उल्लेख केला. या मंदिराची १२ एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती, अमित शहा यांच्या भाषणामुळे हे मंदिर पुन्हा चर्चेत आले आहे. (Kankaleshwar temple was atrocities since the Nizam erathe Nizam had imposed a ban the Waqf Board took possession of the land)
र चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) यांनी 10 व्या ते 11 व्या शतकातहे दशावतारी मंदिर बांधले. मात्र कंकालेश्वर मंदिरावर निजाम राजवटीत अत्याचार झाले, हे सत्य आहे. महाशिवरात्रीच्या जत्रेला बंदी घालण्यात आली . क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. 17 सप्टेंबर 1948 अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी दिवशी हे मंदिर खऱ्या अर्थाने मुक्त झाले.

हे शिवमंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले आहे. ‘बिंदुसरा’ नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने दहाव्या ते 11 व्या शतकात हे मंदिर बांधले. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. या मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे शिल्प आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. जैन धर्मियांतील आर्यनाथ, नेमिनाथ या २ तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह असून ते पाचशे वर्षांपासून बंद आहे.

मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मुखमंडप, त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून ३ बाजूंना गर्भगृहे आहेत. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची आहेत. मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. मंडपाच्या ४ मुख्य दिशांना आणि ४ उपदिशांना सोळा स्तंभ आहेत. या स्तंभांवर घुमटाकार छत आहे. छतावर फुलांची सुंदर नक्षी असून मध्यभागी सर्वात वर कमळ आहे.

मंदिराच्या बाहेर शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील देवदेवता आहेत. कंकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहांचे दरवाजे द्वारे पंचशाखा प्रकारचे आहेत. मुख्य गर्भगृहाच्या डोक्यावर गणेशमूर्ती आहे. या पुरातन मंदिराचा उल्लेख पुराण ग्रंथातही आहे. अत्री ऋषी आणि अनुसया यांनी या ठिकाणी शिधेश्वराचा अभिषेक केला. ब्रह्मा-विष्णू आणि महेशाला प्रसन्न करून घेतल्याची कथा सांगितली जाते.