खासदार विशाल पाटील काँग्रेसला दाखविणार कात्रजचा घाट..

विशेष प्रतिनिधी

सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगलीतील उमेदवारीवरून महायुती तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोर विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. पण आता विशाल पाटील काँग्रेसला कात्रजचा घाट दाखविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विश्वजीत कदम यांची चांगलीच पंचायत झाली आहे. ( MP Vishal Patil in mood to leave Congress)

भविष्यात आपण काँग्रेस नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाऊ असे पाटील यांनी थेटच सांगितले आहे. त्यामुळे पाटील काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली होती. विशाल पाटील काँग्रेसकडून इच्छुक असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले होते. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विश्वजित पाटील यांच्यासह, महाविकास आघाडी म्हणून चंद्रहार पाटील यांच्या स्टेजवर हजेरी लावली. परंतु, आतून विशाल पाटील यांच्यासाठी जिवाचे रान केले. घडले तसेच, चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आणि विशाल पाटील निवडून आले. एकप्रकारे ‘सांगलीचे वाघ आम्हीच आहोत,’ असे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी दाखवून दिले होते.

काँग्रेस श्रेष्टींची नाराजी काढण्यासाठी कदम स्वतः पाटील यांना दिल्लीला घेऊन गेले. सोनिया गांधी यांची भेट घडवून आणली. काँग्रेसचे सहयोगी सदस्य केले. काँग्रेसचे लोकसभेत 99 खासदार निवडून आले आहेत. विशाल पाटील हे शंभरावे खासदार असे सांगितले जाऊ लागले.

या सगळ्यात विश्वजीत कदम यांची पंचायत झाली आहे. विशाल पाटील जर पक्ष सोडून गेले तर काँग्रेसला आणि महायुतीतील इतर नेत्यांना काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तर दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा आहे की विश्वजीत कदम हेच सध्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरु आहेत.

मात्र आता विशाल पाटील यांनी काँग्रेसलाच कात्रजचा घाट दाखवण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हस्ते पार पडले. यावेळी विशाल पाटील उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले, “मंत्री जयकुमार गोरे हे सांगलीचे जावई आहेत. आमच्यावर शेजारी गोरेंची सासरवाडी आहे. गोरे पण प्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मी पण प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय. भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईल. जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे. आम्ही पण पुढे जावे, अशी आशा आहे.