विशेष प्रतिनिधी
मुंबई : खासदार, प्रवक्ते आणि मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक अशा विविध भूमिकांत काम करणारे आणि दररोज सकाळी आपल्या जिभेचा पट्टा चालविणारे संजय राऊत यांच्याविषयी ठाकरे गटात प्रचंड नाराजी आहे. पण आता आणखी एक राऊत ठाकरे गटाला संपवत असल्याचा आरोप त्यांचेच जुने सहकारी संजय घाडी यांनी केला आहे. (Now this Raut has become Uddhav Thackerays headache a major contribution in ending Shiv Sena in Konkan)
शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजना घाडी आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यावर घाडी यांनी उद्धव ठाकरे यांचीच साथ दिले होती. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलनातही त्यांचाच सर्वाधिक सहभाग होता. मात्र ठाकरे गटातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना जबाबदार धरले आहे.
विनायक राऊतांनी कोकणात उद्धवसेना संपवली, अशी थेट टीका संजय घाडी यांनी केली आहे. घाडी म्हणाले, उद्धव ठाकरे यांना दाऊदकडून नाही तर विनायक राऊत यांच्यापासून खरा धोका आहे. ते स्वतः तर लोकसभेला पडलेच. पण त्यांनी कोकणातही शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. ठाकरे गटातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल.
विनायक राऊत यांचा मातोश्रीवर हस्तक्षेप वाढला असून, लोक म्हणतात, त्याप्रमाणे आता त्यांनी बिछाना घेऊन मातोश्रीवर येणे बाकी आहे. राऊत यांचा पक्षसंघटनेतही हस्तक्षेप वाढला असून त्यामुळे संघटनेचे नुकसान होत आहे असा आरोपही संजना घाडी यांनी केला. आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. मातोश्रीवर गद्दार हा शिक्का तयार करून ठेवलेला आहे. पक्षातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला पक्षांतर्गत गद्दार बसले आहेत, त्यांचा वेळीच बंदोबस्त केला तर कदाचित ती संघटना वाचू शकेल. ठाकरे यांचा पक्ष सध्या शिवसेना नेते विनायक राऊत चालवत आहेत. विनायक राऊत हेच सध्या पक्षातील नियुक्ती करतात, तेच तिकीट वाटप करतात. राऊत हे कशा पद्धतीने पक्ष चालवतात ते बऱ्याच जणांना माहिती आहे. ठाकरे यांचा पक्ष हा हिंदूत्वापासून खूप दूर गेला असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.
आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. आपल्या प्रभागात स्पोर्टस क्लब करायचा आहे, प्रसुतीगृह अद्ययावत करायचे आहे. अशा विकासकामांसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे घाडी यांनी सांगितले.
