विशेष प्रतिनिधी
अमरावती : आमचे सरकार केवळ डबल इंजिनचं सरकार नाही तर डबल बुस्टर सरकार आहे. म्हणून सरकार वेगाने चालतंय. आम्ही तिघेही महाराष्ट्राचा विकास करत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( Our government has double engines and double boostersthe Chief Minister said that all three are developing the state.)
अमरावती येथे विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं, हे मंत्री महोदयांनी आत्ता सांगितलं. पण आमचं केवळ डबल इंजिनचं सरकार नाही तर डबल बुस्टर सरकार आहे. म्हणून आमचं सरकार वेगाने चालतंय. आम्ही तिघेही महाराष्ट्राचा विकास करत आहोत. महाराष्ट्राला विकसित राज्य करायचं आह.
आधी या विमानाची सेवा फक्त व्हीआयपींसाठी होती, पण आजपासून सामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता आहे. रेल्वेने अमरावतीवरून मुंबईला यायला 12 तास लागतात. विमान सेवेमुळे हा अंतर अवघ्या पावणे दोन तासाचे होणार आहे. त्यामुळे आता अमरावतीकरांचे 10 तास वाचणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे मुंबईशी जोडलो गेलो आहोत. राज्यात नवीन पोर्ट झाला. वाढवण बंदरलाही आपण जोड देत आहोत. त्यामुळे विदर्भ जेएनपीटीशी आणि वाढवण बंदरशीही जोडला जाणार आहे. त्यामुळे पोर्ट लेअर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सात लाख कोटीचे करार विदर्भातील आहे. दावोसमधील हे करार आहेत.
नदी जोड प्रकल्पाने सात जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलेल. विदर्भात दुष्काळच राहणार नाही. दुष्काळमुक्त होईल. कोरडवाहू शेतीही राहणार नाही. अमरावती विभाग हा महाराष्ट्र सरकारच्या अजेंड्यावर असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अकोल्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे. यवतमाळच्या विमानतळाचं विस्तारीकरण करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो, उद्योग हवे असतील तर विमानतळाची कनेक्टिव्हिटी पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अमरावतीत मेडिकल कॉलेज सुरू केलं. येत्या काळात अमरावतीत आयटी पार्क सुरू करण्याचा आपला प्रयत्न असेल. आज सुरुवात झाली आहे. आज एक फ्लाईट सुरू झाली आहे. या विमानतळाला विस्तारीत करायचं आहे. आपल्याला 3 हजार मीटरची धावपट्टी करायची आहे. पुढे काही भूसंपादन तयार करायचं आहे. ते झालं तर आपली धावपट्टी वाढू शकते. अमरावतीत कोणतंही विमान उतरू शकेल अशी धावपट्टी करायची आहे,असं फडणवीस म्हणाले.
