विशेष प्रतिनिधी
मुंबई : पती गमावलेल्या महिलांनी समोर आक्रोश करत हिंदू असल्याचे सांगितल्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याचे शरद पवारांना सांगितले. तरीही धर्म विचारून गोळीबार करण्यात आला असे म्हणतात. मात्र, याबाबत सत्य काय हे मला माहित नाही, असे वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. (Outcry in front But Sharad Pawar says killed them because they were Hindus I dont know what the truth is)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असताना, शरद पवार मात्र देशाच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी धर्मावर चर्चा का होते, असा प्रश्न उपस्थित केला. वास्तविक कालच शरद पवारांनी पुण्यात जगदाळे आणि गणबोटे कुटुंबाची भेट घेतली होती. त्यावेळी महिलांनी आक्रोश करत आपल्याला कसा धर्म विचारला, अजान म्हणायला सांगितली, हे पवारांना सांगितले. तरीही “खरं काय आहे ते माहित नाही,” असा गोंधळाचं वक्तव्य पवारांनी केले आहे. एवढंच नव्हे, तर “त्या ठिकाणी उपस्थित महिलांना हात लावला नाही,” असे म्हणत त्यांनी जणू काही दहशतवाद्यांचा चांगुलपणा सांगण्याचा प्रयन्त केला.
कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता असल्याचा केंद्राचा दावा फोल असल्याची टीका करताना पवारांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर आरोप केले. मात्र, देशावर झालेल्या हल्ल्यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन सरकारला पाठिंबा द्यायला हवा, हे ते स्वतः सांगतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र सरकारवर कुरघोडी करण्याची संधीही सोडली नाही.
ज्याने हल्ले केले त्यांना शोधून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून शरद पवारम्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी काश्मीरमधील लोक रस्त्यावर आले आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले. ही अतिशय सकारात्मक बाब आहे. मात्र आता जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटक जाणार नाहीत आणि त्याची झळ तेथील स्थानिक नागरिकांना बसेल याची चिंता आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारच्या वतीने या संदर्भात पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एका दृष्टिकोनातून पाकिस्तानला एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे.
