विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारण्यात आला का, यावर शंका उपस्थित केली. पण केवळ पवारच नव्हे तर संपूर्ण विरोधी पक्षच ही लाजीरवाणी भूमिका मांडत आहे.
( They say terrorists did not ask for religionnot only Sharad Pawar but all the opposition parties shameful stance on the Pahalgam attack)
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हिंदू आहात का? कलमा वाचायला येतो का येथपासून पॅन्ट कडून सुंता झाली का नाही हे पाहून हिंदू पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. दहशतवाद्यांनी हिंदू ओळख पटवण्यासाठी पर्यटकांचे आयकार्ड तपासले, ‘कलमा’ म्हणायला लावले, आणि काही पुरुष पर्यटकांना अर्धनग्न करून त्यांच्या धर्माची खात्री केली. अनेक पर्यटकांच्या नातेवाईकांनी याच्या करुण कहाण्या सांगितल्या. शरद पवार यांनी दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या पुण्यातील देशमुख आणि गणबोटे कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी महिलांनी आकांत करत हिंदू आहे म्हटल्यावर कशा गोळ्या घातल्या हे पवारांना सांगितले. मात्र तरीही पवारानी आपला तथाकथित सेक्युलर अजेंडा चालविण्यासाठी संभ्रम निर्माण केलाच. दहशतवाद्यांनी धर्म विचारला का, हे अजून निश्चित झालेले नाही.या विधानाने पवारांनीही काँग्रेस आणि इतर विरोधकांसारखाच अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानचा बचाव केल्याचे दिसून आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पवारांना सुनावले. मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांचा अपमान करू नका असे सांगितले.
मात्र तरीही काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पवारांच्याच भूमिकेची री ओढली. वडेट्टीवार यांनी पीडित पर्यटकांच्या साक्षीवरच संशय घेत म्हटले,”दहशतवाद्यांना इतका वेळ असतो का धर्म विचारण्यासाठी?” मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्खपणाचे वक्तव्य म्हणत चांगलेच सुनावले.
कर्नाटकचे काँग्रेसचे मंत्री आर. बी. थिम्मापुर यांनीही दावा केला की, “दहशतवादी कधीच धर्म विचारत नाहीत,” आणि सगळा प्रकार “बुद्धिभ्रमाचा प्रचार” असल्याचे सांगत मृतांच्या कुटुंबीयांवर अविश्वास व्यक्त केला. ‘
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांनी धक्कादायक विधान करत म्हटले,
“जर पाकिस्तान म्हणत असेल की त्यांचा हल्ल्यात सहभाग नाही, तर आपण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायला हवा.”इतकेच नाही, तर त्यांनी इंडस वॉटर ट्रीटी निलंबित केल्याबद्दल भारत सरकारवरच टीका केली. पाकिस्तानला पाणी मिळाले नाही तर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये पूर येईल, असा हास्यास्पद युक्तिवाद त्यांनी केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी हा हल्ला थेट फाळणीच्या ‘अपूर्ण प्रश्नां’शी जोडला. म्हणजेच, भारतात दहशतवाद चालू राहणे हे त्यांच्या मते इतिहासाचे अपरिहार्य परिणाम आहेत!
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी तर या हल्ल्याची जबाबदारी थेट भारतातील ‘हिंदुत्वाच्या धोरणांवर’ टाकली. ते म्हणाले,”देशात हिंदुत्वामुळे मुस्लीम असुरक्षित वाटतात, त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले घडतात.”याचा अर्थ त्यांच्या मते, हिंदूंच्या नरसंहारासाठी जबाबदार भारतातील हिंदू आहेत!
या सर्व प्रकरणामुळे काँग्रेस पक्षात मोठा गोंधळ उडाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांना “पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे पालन करा” असे बजावले आहे. जयराम रमेश यांनी यावर ‘व्यक्तिगत मत’ असल्याचे स्पष्टीकरण देत डॅमेज कंट्रोल करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
आज भारतासमोर प्रश्न आहे जेव्हा इस्लामी दहशतवादी हिंदूंना निवडून मारतात, तेव्हा विरोधक कोणाच्या बाजूने उभे राहतात?
हिंदूंच्या नरसंहारावर मौन, पीडितांवर संशय, आणि पाकिस्तानला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न यावरून स्पष्ट होते की काँग्रेस आणि विरोधकांची सहानुभूती भारताच्या विरोधात, आणि पाकिस्तानच्या बाजूने वळली आहे.
देशहितासाठी, हिंदूंच्या संरक्षणासाठी, आणि इस्लामी दहशतवादाचा स्पष्ट उल्लेख करण्याची गरज असताना लांगुलचालनाचे आणि तृष्ठीकरणाचे राजकारण करून मुस्लिम मतपेढी सुरक्षित ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते करत आहेत.
पहलगाम येथे इस्लामी दहशतवाद्यांनी फक्त हिंदूंना लक्ष केले, त्यांच्या धर्माची तपासणी करूनच गोळ्या घातल्या हे वास्तव आहे. प्रत्यक्षदर्शींनी हे स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र काँग्रेस व अन्य विरोधक त्या वास्तवावर पांघरूण घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
ही भूमिका केवळ हिंदूविरोधी नाही, तर देशविरोधी देखील आहे. धार्मिक दहशतवादाचे सत्य स्पष्टपणे मान्य केले नाही, तर उद्या अखंड भारताला अशा हल्ल्यांचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
